बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देवाचं नाव घेणं जर गुन्हा असेल तर…’; नवनीत राणांचं शिवसैनिकांना सडतोड उत्तर

मुंबई | राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांमध्ये धार्मिक मुद्द्यांवर जोरदार तापलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर वाद वाढला आहे. शिवसैनिकांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं. त्याला आता राणा यांनी उत्तर दिलं आहे.

शिवसैनिकांनी आताही शिवसेना भवनाच्या बाहेर मोठी गर्दी करत राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. देवाचं नाव घेणं जर गुन्हा असेल तर जरूर माझ्या नावानं मुर्दाबादचे नारे लावावेत, असं उत्तर राणा यांनी शिवसैनिकांना दिलं आहे. परिणामी वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

शिवसैनिकांनी तारीख आणि वेळ सांगावी, त्यादिवशी मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करेन, असं खुलं आव्हान देखील राणा यांनी दिलं आहे. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सुन आहे त्यामुळं दोघांची ताकद आपल्या पाठीशी असल्याचं राणा म्हणाल्या आहेत. राणांनी यावेळी शिवसैनिकांना चर्चेचं आव्हान देखील दिलंय.

दरम्यान, राज ठाकरेंच्या भोंग्यावरील भूमिकेनं राज्यात कायदेशीर वादाला सुरूवात झाली आहे. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत राहून निर्णय घेणार असल्याचं जाहीर केल्यानं आता राज ठाकरे काय भूमिका घेणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘सिल्वर ओक’ हल्ला प्रकरणातील पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड!

“अंगावर शाॅल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब होत नाही”

IPL 2022: CSKला मोठा धक्का! धडाधड गडी टिपणारा ‘हा’ स्टार गोलंदाज संघाबाहेर

“राज ठाकरे हे मराठी ओवैसी, ते फक्त हिंदूंना भडकवतात”

मोठी बातमी! जयश्री पाटलांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More