बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी खालच्या जातीची असल्याचं म्हणत त्यांनी मला…’; नवनीत राणांचा अत्यंत गंभीर आरोप

मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. राणा दांपत्य मुंबईत दाखल होताच शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर राणा दांपत्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे. त्यानंतर नवनीत राणांनी पोलिसांवर (Police) गंभीर आरोप केले आहेत.

नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Loksabha Speaker Om Birla) यांना पत्र लिहून आपल्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. मी खालच्या जातीची असल्यानं मला तुरूंगात पाणी देखील दिल नाही, असा आरोप राणा यांनी केला आहे. मी रात्रीच्या वेळी बाथरूमचा वापर करणार होते पण तुरूंग प्रशासनानं माझ्या मागणीचा विचार देखील केला नाही, असा आरोप राणा यांनी केला आहे.

माझ्याशी बोलताना तेथील कर्मचाऱ्यांनी अभद्र भाषेचा वापर केला. सर्वात गलिच्छ शिव्या मला देण्यात आल्या. खालच्या जातीची असल्यानं आमचं बाथरूम वापरता येणार नाही, असं सांगण्यात आलं, असंही राणा आपल्या पत्रात म्हणाल्या आहेत. ठाकरे सरकार चालवणारी शिवसेना हिंदूत्वाच्या विचारांपासून लांब आल्याची टीका राणांनी केली आहे.

दरम्यान, नवनीत राणा या लोकसभा सदस्या असल्यानं त्यांच्या पत्राची अध्यक्षांकडून दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. परिणामी राणा दाम्पत्याचा वाद हा आता राज्य सरकारसाठी कायदेशीर पेचप्रसंग निर्माण करणारा आहे.

थोडक्यात बातम्या – 

“निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार मी येणारच्या घोषणा दिल्या आता मात्र…”

किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“…तर लोक या महाराष्ट्रद्रोह्यांना जागोजागी चपला मारतील”

‘या’ खास कारणामुळे ट्विटरवर ट्रेंड होतोय शाहरूखचा मन्नत बंगला

महाराष्ट्रावर दुहेरी संकट, हा आठवडा महत्त्वाचा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More