अडसूळांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवून ‘अडसूळसेना’ निर्माण केली; नवनीत राणांचा हल्लाबोल

अमरावती |  आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना संपवून काही लोकांचे जीव घेतले. खरं म्हणजे अडसूळांचा आणि अमरावातीचा काहीही संबंध नाही. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवून ‘अडसूळसेना’ निर्माण केली आहे, अशी टीका आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे अमरावतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यावर केली.

अडसूळांचं अमरावती मतदारसंघात नाव नाही. त्यांना अमरावतीचं काहीही देणघेणं नाही. मग अशा माणसाला निवडून का द्यायचं? असं नवनीत राणा म्हणाल्या.

अडसूळांनी स्थानिक शिवसैनिक घरी बसवले आणि काही शिवसैनिकांचे जीव घेतले, असा गंभीर आरोप नवनीत राणांनी अडसूळांवर केला.

दरम्यान, अमरावतीच्या मतदानाला फक्त दोन दिवस बाकी असताना प्रचारला अधिक जोर चढल्याचं दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-राष्ट्रवादी म्हणजे शेण खाणाऱ्यांची अवलाद; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

-56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट असतं- रितेश देशमुख

-सर्व चोरांचे नाव ‘मोदी’च कसे? राहुल गांधींचा सवाल

-अर्जुनसोबत लग्न करणार का?; अखेर मलायकाने सोडले मौन

-जबरदस्त! पोलार्डने एबी डीव्हिलियर्सला केलेले रन-आऊट पाहाच एकदा!