बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मक्याच्या शेतातून बँड-बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लग्न विचित्र पद्धतीनं पार पडल्याचं दिसत आहे. याठिकाणी कोरोना नियमांचं आणि लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी नवरदेवाची वरात थेट शेतातून काढली आहे.

बँड, बाजा वाजवणारी मंडळी शेतातीतील सरीतून पुढे चालत आहेत. तर त्या पाठीमागे वऱ्हाडी आणि नवरदेव चालताना दिसत आहे. हे लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडीओला जवळपास 35 हजार लोकांनी पाहिलं आहे, तर अडीच हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. अनेक लोकांनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये नवरा मुलगा बँड-बाजासह मक्याच्या शेतातून येत आहे. एवढंचं नव्हे तर, त्याच्यासोबत लहान मुलं, स्त्रिया आणि अन्य लोकंही दिसत आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल व्हायरल होत आहे.

कोरोनामुळे लग्न आणि इतर समारंभासाठी परवानगी घ्यावी लागत आहे. काही लग्नांना परवानगी दिल्यानंतरही मोठ्या प्रमाणात गर्दी करून कोरोना नियमांचा फज्जा उडवला जात आहे. तर काहींनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विवाह आणि इतर समारंभ पुढे ढकलले आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“देशात कोरोनामुळे 1 ऑगस्टपर्यंत दहा लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता”

“पदोन्नतीमधील 33 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या”

‘मला मनसुख हिरेन व्हायचं नाही’; व्यावसायिकाचा परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप

‘सगळे पुरूष एक सारखेच असतात’; शाहीदची पत्नी मीराने सांगितली त्याची वाईट सवय

दिलासादायक! पुण्यात नव्याने कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा 4000 हून अधिक डिस्चार्ज, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More