बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांना दिली ‘नवरत्न तेलाची बाटली’ गिफ्ट!

पुणे | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. मात्र या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना थेट नवरत्न तेल डोक्याला लावण्यासाठी पाठवलं आहे.

आपण कुणाबद्दल बोलतो, आपली तेवढी उंची आहे का, बोलताना जरा डोकं शांत ठेवून टीका करत जा, म्हणून हे नवरत्न तेल तुमचं डोकं शांत करण्यासाठी पाठवत आहे. आणि तरीही तुमचं डोकं शांत नाही झालं तर, त्याचा इलाज मी स्वखर्चाने करतो, असा इशाराच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने दिला आहे. संदीप काळे असं या कार्यकर्त्यांचं नाव आहे.

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. चंद्रकांत पाटील आपलं वय आहे, तेवढी त्यांची कारकीर्द आहे. आपण बोलताना जरा सांभाळून बोलायला हवं. मी तुम्हाला हे परत परत सांगतीय. राजकारणात एकेरी भाषेत बोलू नये, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, सांगलीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेलं, कधी 60 वर तो गेला नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

थोडक्यात बातम्या- 

“तुम्हालाही माझा अभिमान वाटेन”; आर्यन खानने समीर वानखेडेंना दिलं ‘हे’ वचन

का वाढतोय कॅन्सरचा धोका?, अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर

‘या’ 22 जिल्ह्यांना आज पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

अखेर काँग्रेसचा अध्यक्ष ठरला, कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“पंजाबला अशांत होऊ देऊ नका, आपण इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत मोठी किंमत मोजली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More