बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता देवीच्या मंडपात फक्त 5 जणांनाच परवानगी, वाचा सविस्तर

सोलापूर | शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरूवात झाली. 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान यावर्षीची नवरात्री साजरी केली जाणार आहे. नऊ दिवस उत्साहाने साजरा होणारा हा सण यंदाही साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी गर्दी टाळण्यासाठी सोलापूर स्थानिक प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे.

आता देवीच्या मंडपात एका वेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना थांबता येणार नाही. तर देवीच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणूकीलाही परवानगी नाही. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक, वेबसाईट या माध्यमांद्वारे करण्यावर भर द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत.

नवरात्रीत आरती, भजन, कीर्तन या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. मंडळांनी दांडिया, गरबा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये.  रक्तदान शिबिरे, आरोग्यविषयक शिबिरांना मंडळांनी प्राधान्य द्यावं. मंडळाकडून सामाजिक, आरोग्यविषयक संदेश जाईल, अशाच जाहिराती कराव्या.

सार्वजनिक मंडळासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ही 4 फूट आहे तर घरगुती मूर्तीची उंची 2 फूट असावी. मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे आणि ते शक्य नसल्यास स्थानिक प्रशासनाशी कृत्रिम विसर्जन स्थळासाठी संपर्क साधावा, अशा मार्गदर्शक सुचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! पवारांशी संबंधित कारखाने आणि संचालकांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी

‘येत्या 8 दिवसांमध्ये अटक केली नाही तर…’, राकेश टिकैत यांचा योगी सरकारला इशारा

‘या’ पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय; धनंजय मुंडेंनी दिली माहिती

भीषण अपघात! बस आणि ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू, 27 जण रुग्णालयात

नरेंद्र मोदींनी वाहिली नटू काकांना श्रद्धांजली, जुना फोटो शेअर करत म्हणाले….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More