अगोदर महामार्ग बनवा आणि मग नावं देण्यासाठी भांडणे करा-नवाब मलिक

मुंबई | अगोदर समृद्धी महामार्ग बनव आणि मग काय नाव द्यायचं आहे, यासाठी भांडणे करा, असा टोला राष्ट्वादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप-शिवसेनेला लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

समृध्दी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेने तर भाजपने माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यावर मलिक यांनी निशाणा साधला.

सुरुवातीला समृध्दी महामार्गाला विरोध करायचा आणि आता त्याच समृध्दी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासाठी भांडणे सुरु करायची, ही दुटप्पी भूमिका शिवसेनेची सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, अगोदर महामार्गाचं काम पुर्ण करा आणि मग नाव देण्यासाठी भांडा, असं त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-माणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे

-भारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी

-दुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार!

-तृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी

-दिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा