मुंबई | राष्ट्रवादीचे नेते व कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ताब्यात घेतलं. नवाब मलिकांना अटक झाल्यापासून त्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत होती.
वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी नवाब मलिकांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मलिकांना किडनीचा त्रास होत असल्याने त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी परवानगी मागत सहा आठवड्यासांठी जामीन मंजूर करण्याचा अर्ज मलिकांच्या वकिलांनी केला होता. अखेर मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे.
नवाब मलिकांना खासगी रूग्णालयात उपचार करण्याची परवानगी सत्र न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे नवाब मलिकांवर आता कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार होणार आहेत.
दरम्यान, नवाब मलिकांना वैद्यकीय कारणासाठी जामीन मिळाला नसला तरी खासगी रूग्णालयात उपचार करण्याची मलिकांची मागणी सत्र न्यायालयाने मंजूर केली आहे. तर उपचारांसह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिकांना करावा लागणार आहे.
थोडक्यात बातम्या-
पुणे रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बॉम्बसदृश वस्तूबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
“…तर तुम्हाला देखील याच कबरीत जावं लागेल”
‘पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला नाही औरंगजेबाकडे पाठवलं तर…’; नितेश राणे कडाडले
‘नया है आप!’, अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या दीपाली सय्यदना मनसेनं सुनावलं
किम जोंग उनच्या उत्तर कोरियात कोरोनाचा विस्फोट; धक्कादायक आकडेवारी समोर
Comments are closed.