बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीसांच्या काळात कुणी काय केलं ते लवकरच बाहेर काढणार”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रानं यंत्रणेचा वापर केला तर महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं असं म्हटलं होतं. यावर ष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र सांगितलंय की केंद्रानं यंत्रणांचा वापर केला असता अर्ध मंत्रिमंडळ तुरूंगात दिसलं असतं. आम्ही म्हणतो की पूर्ण मंत्रिमंडळ तुरूंगात टाका. जनता पाहतेय, बंगालमध्ये जनतेनं जे ऊत्तर दिलं तेच ऊत्तर तुम्हाला इथे मिळेल, असं नवाब मलिक म्हणाले.

भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअर केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता त्यावर नवाब मलिकांनी फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय- काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू, असा इशारा नवाब मलिकांनी दिला.

शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी बोलताना  एक वर्षांपासून शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष केलं जातंय असं म्हटलं. केंद्र शेतकरी आंदोलनाला गांभीर्याने घेत नाही. आंदोलन भटकेल  असं त्यांना वाटतं. लखीमपूर खेरी मध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली. शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष करण्याऐवजी आंदोलन चर्चेतून सोडवलं आहे. शरद पवार त्यासंदर्भात सूचक वाक्य बोलत होते हे केंद्र सरकारला कळायला हवं, असं नवाब मलिक म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांना दिली ‘नवरत्न तेलाची बाटली’ गिफ्ट!

“दलित आणि मुस्लिमांची नावे मतदार याद्यांतून गहाळ करण्यात आली आहेत”

“तुम्हालाही माझा अभिमान वाटेन”; आर्यन खानने समीर वानखेडेंना दिलं ‘हे’ वचन

का वाढतोय कॅन्सरचा धोका?, अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर

‘या’ 22 जिल्ह्यांना आज पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More