बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय”

मुंबई | राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. याला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय? माशा मारण्याचा आनंद घ्या, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपाकडून माशा मारण्याच्या स्पर्धाही भरवा!, असा सल्लाही नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे.

दरम्यान, 102 व्या घटना दुरुस्तीत राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यात आल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने तात्काळ कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभारीच आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यपालांच्या हातात काही नसताना देखील सत्ताधारी राज्यपालांना भेटत आहेत. ही सर्व नौटंकी आहे. हा सर्व टाईमपास सुरू आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘जान मी तुझीच आहे पण…’; 17 वर्षीय मुलीचं आत्महत्येपूर्वी बॉयफ्रेंडला पत्र

आक्रमक हार्दिक पांड्याला भारतीय संघातून डच्चू, समोर आलं ‘हे’ कारण

13 वर्षाच्या मुलाकडून 25 वर्षीय मोठ्या भावाची हत्या; अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर

‘धकधक गर्ल’ माधुरीचा 54वा वाढदिवस; जाणून घ्या माधुरी विषयी काही खास गोष्टी

करुणा मुंडेंच्या पुस्तकावरुन वादाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More