बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! नवाब मलिक ईडीच्या कार्यालयात, चौकशीला सुरूवात

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या रडारवर आले आहेत. नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

नवाब मलिक सकाळी पावणे आठच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरवात झाल्याचं म्हटलं जात आहे. ईडीचे अधिकारी घरी छापा टाकणार असल्याचं नवाब मलिक अनेकदा उघडपणे म्हणाले आहेत. मात्र, या चौकशीबद्दल मलिकांनी काहीच वाच्यता न केल्याने अनेक तर्क लावले जात आहेत.

नेमक्या कोणत्या प्रकरणात नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे या चौकशीतून काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नवाब मलिक अचानक ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, ईडी पथकांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संबंधित असलेल्या मालमत्तांवर छापे टाकले होते. दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकर याची चौकशी झाल्यानंतर डी गँग आणि राजकीय नेत्यांच्या कनेक्शनप्रकरणी तपास सुरू असल्याची चर्चा होती. या प्रकरणीच नवाब मलिकांना चौकशीसाठी बोलावलं असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

नोकरी करत करू शकता ‘हा’ व्यवसाय, महिन्याला मिळतील जास्तीचे 30 हजार

सकाळी उठताच तुम्हालाही ‘या’ गोष्टी करायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा

भाजप-सेनेची युती होणार?, ‘या’ भेटीमुळे चर्चांना उधाण

“…त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार पडणार, दिवा विझण्यापुर्वी फडफडतो”

सुप्रिया सुळेंना सातव्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार, 11 पैकी 4 महाराष्ट्राचे खासदार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More