Top News महाराष्ट्र मुंबई

“ठाकरे सरकारला फडणवीसांच्या सल्ल्याची गरज नाही, त्यासाठी त्यांनी एखादी कंपनी उघडावी”

मुंबई |   उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडी सरकारला देवेंद्र फडणवीसांच्या सल्ल्याची गरज नाही. त्यासाठी त्यांनी एखाद्या सल्ला कंपनीची स्थापना करावी, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

भाजपने कितीही राजकारण केलं तरी ठाकरे सरकार स्थिर आहे आणि स्थिर राहिल. आमचं सरकार व्यवस्थितपणे पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला. तसंच विरोधी पक्षाने कोरोनाच्या या संकटकाळात राजकारण करणं आता थांबवलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केंद्राच्या पॅकेजचा उल्लेख करत महाराष्ट्राला मोठा फायदा झाल्याचं किंवा निधी मिळाल्याचा दावा केला. यावरही मलिक यांनी आपलं मत व्यक्त केलं. केंद्राकडून महाराष्ट्राला कोणतंही पॅकेज मिळालं नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, कोरोनाच्या या जागतिक संकटात सरकारला सहकार्याची आवश्यकता असते राजकारणाची नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसंच येणाऱ्या काही दिवसांत कोरोनावर महाराष्ट्र नियंत्रण मिळवेल. सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचं मलिक म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी

भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

महत्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीस यांचं ‘ते’ वक्तव्य धादांत खोटं; गृहमंत्री अनिल देशमुखांचा पलटवार

आनंदाची बातमी… पुण्यात कोरोनाबाधित महिलेने दिला कोरोनामुक्त बाळाला जन्म!

शाहीद आफ्रिदी पुन्हा बरळला; अभिनंदनसंदर्भात केलं हे वादग्रस्त वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या