बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी सीडी काढली तर…’; मलिकांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) चांगलेच चर्चे आले आहेत. नवाब मलिक यांनी केेलेल्या आरोप आणि गौप्यस्फोटांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ पाहायला मिळाली होती. तर नवाब मलिक यांनी केलल्या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

एनसीबी (NCB) झाली आता ईडीची (ED) बारी, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. तर आता लवकरच ईडीचा पर्दाफाश करणार असल्याचा दावाही नवाब मलिकांनी केला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी बोलताना नवाब मलिकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा भांडाफोड करण्यासाठी मी अजून हायड्रोजन बॉम्ब फोडला नाही, तो योग्य वेळी फोडेन, असा इशारा नवाब मलिकांनी दिला आहे. माझ्याकडेही भाजपवाल्यांच्या अशा सीडी आहेत की त्या लावल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा खळबळजनक दावाही नवाब मलिकांनी केला आहे.

हा माझा व्यक्तिगत लढा नसून केंद्रीय तपास यंत्रणांविरोधातील लढा आहे. म्हणून मी एनसीबीच्या बोगस कारवाया उघड केल्या. मनातील भीती काढून टाकू आणि भाजप (BJP) विरोधात लढू, नक्की यश येईल, असा सल्ला नवाब मलिकांनी कार्यकर्त्यांना दिला आहे,

थोडक्यात बातम्या-

“अमरावतीत झालेला प्रकार संयोग नव्हे तर प्रयोग होता”

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

Whatsappचा भारतीयांना जोरदार झटका, केली ‘ही’ मोठी कारवाई

चिमुकली हट्टाला पेटली अन् फडणवीस काकांनी पुरवला ‘तो’ बालहट्ट; पाहा व्हिडीओ

“लस प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो छापता तर लोकांच्या मृत्यूची जबाबदारी देखील घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More