महाराष्ट्र मुंबई

“राज्यपालांनी अर्णब गोस्वामींऐवजी नाईक कुटुंबाची काळजी करावी”

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती. यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भगतसिंह कोश्यारींना टोला लगावला आहे.

राज्यपालांनी गंभीर गुन्ह्यातील अर्णव गोस्वामींची काळजी करण्याऐवजी नाईक यांच्या कुटुंबीयांची काळजी करावी, असं नवाब मलिक म्हणालेत. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

राज्यपाल कोणाची चिंता करत आहेत. अर्णव गोस्वामी यांना गंभीर गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे. आरोपींना नियमानुसारच सर्व गोष्टी दिल्या जातात. त्यांची विशेष कैदी म्हणून राज्यपालांनी काळजी करू नये, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय.

दरम्यान, राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दूरध्वनी केला. त्यावेळी अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटून दिलं जावं, असंही राज्यापाल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“ठाकरे सरकारविरोधात 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा”

संग्राम देशमुख माझा जावई नाही, मेधाताई काही माझ्या दुश्मन नाही- चंद्रकांत पाटील

हायकोर्टाने स्वत: दखल घेऊन अर्णब गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करावी- देवेंद्र फडणवीस

तासाभरात 1 महिन्याचा, तर दिवाळीपूर्वी 2 महिन्यांचा पगार आणि बोनस जमा करणार- अनिल पर

अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या