महाराष्ट्र मुंबई

विवेक ऑबेरॉयवर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादीची मागणी

मुंबई | महिलांचा अपमान करणाऱ्या अभिनेता विवेक ऑबेरॉयवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

विवेक ऑबेरॉयने रविवारी आलेल्या एक्झिट पोलवर एक ट्विट शेअर केलं आहे. त्याने ट्विट करत एक मीम शेअर केलं. या मीममध्ये ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अभिषेक बच्चन दिसत आहे.

https://twitter.com/vivekoberoi/status/1130380916142907392

विवेक ऑबेरॉयने हे मीम शेअर करत एक्झिट पोलची थट्टा उडवली आहे आणि ऐश्वर्या रायची देखील थट्टा उडवली आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

विवेक ऑबरॉय हे भाजपला समर्थन देऊन महिलांबाबत अपशब्द बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-काँग्रेस संपलीच पाहिजे- योगेंद्र यादव

गिरीश महाजनांचं आव्हान नाना पटोलेंनी स्वीकारले; त्यावर महाजनांनी लावली शर्यत!

-हवामान खात्याप्रमाणे एक्झिट पोलचा अंदाजही चुकेल- नाना पटोले

-नागपुरात गडकरींचा मी 5 लाखांहून अधिक मतांनी पराभव करणार; पटोलेंचा दावा

-बीडमध्ये बजरंग सोनवणे की प्रितम मुंडे?; ‘न्यूज18’च्या पोलनं वर्तवला अंदाज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या