बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर लोकसभा निवडणुका पुन्हा घेऊन दाखवा- नवाब मलिक

मुंबई | भाजपची काळजी वाटते त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यावेत. देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांंनी आता लोकसभा निवडणूका पुन्हा घेऊन दाखवावी, असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत जशी भाजपची विधानसभेला अवस्था झाली तशीच देशात होईल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

भाजप नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे. सत्तेत कसं येऊ याचाच विचार दिवसभर करतात. रात्री त्यांना सत्तेची स्वप्नं पडतात. हा आजार वाढत जाणार आहे. त्यामुळे त्यांनी चांगल्या डॉक्टरकडून उपचार घ्यावा, असा सल्ला नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे.

दरम्यान, आम्हाला निवडणुकांचं चॅलेंज देण्यापेक्षा मोदींना सांगून संसद बरखास्त करा. आम्ही लढू आणि जिंकू. तुम्ही जाऊन रुग्णालयात स्वत:चा उपचार करा, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

छत्रपती संभाजी राजेंकडून श्रीरंग बारणेंचं तोंडभरून कौतुक; म्हणाले…

सुशिक्षित, संपन्न कुटुंबांत घटस्फोट जास्त होतात- मोहन भागवत

महत्वाच्या बातम्या- 

चंद्रकांत पाटील म्हणतात, इंदुरीकर महाराजांनी केलेलं वक्तव्य चुकीचं, पण…

अहो फडणवीस, हिंमतीची भाषा करायला जिगर लागते- अमोल मिटकरी

चांगल्या डॉक्टरकडे जाण्याची गरज; नवाब मलिकांचा भाजप नेत्यांना सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More