बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप कार्यकर्ते आहत का? सगळे बीळात शिरले- नवाब मलिक

मुंबई | महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप राज्यभर 400 ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. त्यांच्या या भूमिकेवर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे.

तुम्ही 25 तारखेला मोर्चाचं आयोजन केलंय खरं पण भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? सगळे बीळात शिरले आहेत, असा खोचक टोला अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

एनआरसीला आम्ही कायम विरोध करणार आहोत. हा कायदा आम्ही महाराष्ट्रात लागू करु देणार नाही. भाजपने त्यांच्या पक्ष कार्यालयात आंदोलनं करावीत. कारण तेच हा कायदा लोकांपर्यंत नीट पोहचवू शकले नाहीत, असा सल्ला नवाब मलिकांनी भाजपला दिला आहे.

दरम्यान, सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे पंतप्रधानांच्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डोक्यातील कायदे आहेत. भाजपने या कायद्यांची माहिती लोकांपर्यंत नीट पोहोचवलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये या कायद्यांबाबत भीती निर्माण झाली आहे, असंही नवाब मलिक म्हणले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

तृप्ती देसाई तक्रार दाखल करण्यासाठी आज नगरमध्ये जाणार!

बारावीची परीक्षा आजपासून सुरु; राज्यभरातून 15 लाख विद्यार्थ्यी भविष्य आजमावणार

महत्वाच्या बातम्या-

तृप्ती देसाई, नगरमध्ये येऊन दाखवाच; शिवसेनेच्या आष्टेकरांचं आव्हान

इंदुरीकरांनी 25 वर्षात अनेक चुकीच्या चालीरीती बंद केल्या- बाळासाहेब थोरात

“इंदुरीकरांच्या सांगण्यावरुन मला अनेकांनी धमक्या दिल्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More