बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ ट्विटवर नवाब मलिकांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई | खूप दिवसांपासून रंगलेल्या मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे. काल गुरुवारी आर्यनचा जामीन मंजूर झाला असून अखेर 26 दिवसांनंतर त्याला हा जामीन मिळाला आहे. त्याचा जामीन मंजूर होताच अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रसेचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्यनचा जामीन मंजूर होताच नवाब मलिकांनी ट्विट करत ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या या ट्विटनं पुन्हा एकच खळबळ माजवली. या ट्विटमुळं अनेकांनी मलिकांवर निशाणा साधला आहे. आता मलिकांनी यावर स्पष्टीकरण दिलंय.

आपला उद्देश हा आर्यन खानला जामीन मिळवून देणं हा नाही, मी आर्यनसाठी लढत नव्हतो. मला फक्त फसवेपणा उघडकीस आणायचा होता, असं म्हणत मलिकांनी त्या ट्विटवर स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी अनेक आरोप केले आहेत. अनेक कागदपत्र दाखवत त्यांनी वानखेडेंवर आरोप लगावले आहेत. त्यामुळे आता अनेकांना असं समज झालाय की ते आर्यन खानच्या बाजूनेच बोलत आहे. त्यामुळे मलिकांनी त्या ट्विटवर स्पष्टीकरण दिलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’; आर्यनला जामीन मिळताच नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया

पुणे विमानतळावरून विमानांची उड्डाण पुन्हा होणार सुरू! पण ‘या’ वेळात हवाई वाहतूक बंदच

भाजपचे ‘हे’ माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

“लवकरच पेट्रोल-डिझेल तारण कर्ज सुरू होणार”, मराठी अभिनेत्याचा खोचक टोला

…अन् वकिलांच्या ‘या’ जबरदस्त युक्तिवादामुळे आर्यनचा जामीन झाला मंजूर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More