बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकशाही संपली असं जाहीर करा नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी”

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यात काही दिवसांपुर्वी टीका प्रतिटीका रंगली होती. त्यातच चंद्रकांत पाटील यांनी तुम्ही जामिनावर सुटला आहात, अशी धमकी छगन भुजबळ यांना दिली होती. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी चंद्रकांत पाटलांना चांगलंच फटकारलं आहे.

चंद्रकांत पाटील अशा पध्दतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटो अंतर्गत कारवाई करावी. आजपर्यंत भाजपकडून यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झाले आहे. आता न्यायालयसुध्दा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का, असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.  छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे, असा सवाल देखील नवाब मलिक यांनी विचारला आहे.

छगन भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात. निर्दोष सुटलेले नाहीत. फार बोलू नका. नाही तर महागात पडेल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं. ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या वक्तव्यावर रागावण्यासारखं काय आहे? आता पराभवाची सवय करून घेतली पाहिजे. पराभव सहन करायला हवा. आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?, असा टोला देखील नवाब मलिक यांनी लगावला आहे.

दरम्यान, समीर भुजबळ जेलमध्ये असताना चंद्रकांतदादांकडे मदत मागायला कसा जाईल? सीबीआय, ईडीचा राजकीय उपयोग होतो हे माहिती होतं. आता न्याय देवताही त्यांच्या हातात आहे का?, असा सवाल देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून कंगणा राणावतला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

आनंदाची बातमी! भारतातील ‘ही’ लस कोरोनावर प्रभावी; ICMR च्या संशोधनातून समोर आले निष्कर्ष

पत्नी आणि मुलीसाठी सुट्टी मिळाली नाही; पोलिस अधिकाऱ्याचा बेधडक निर्णय

आईला कोरोना, बेड मिळेना, मात्र मुलगा आणि मुलीनं हार मानली नाही; एका धैर्याची कहाणी!

“हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालबाहेरचे?, टाळी एका हाताने वाजत नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More