बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नवाब मलिक म्हणजे बिघडे नवाब, माझ्या अंगावर कोणी आलं तर…”

मुंबई | समीर वानखेडेंविरोधात अनेक गौप्यस्फोट केल्यानंतर नवाब मलिकांनी त्यांचा मोर्चा आता भाजपकडे वळवला आहे. नवाब मलिकांनी आज सकाळी ट्विट करत अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यानंतर राज्यातील राजकारण तापल्याचं पहायला मिळत होतं. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक म्हणजे बिघडे नवाब आहेत. माझ्या अंगावर आलं तर मी त्याला सोडणार नाही. मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि असत्याला साथ देणाऱ्यालाही सोडत नाही. ज्या गाण्याचा उल्लेख केला जातोय, ते गाणं मी मोफत बनवलं होतं, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

देवेंद्रजी आणि मी आम्हा दोघांच्या दोन आयडेंटिटीज आहेत. मी गायिका आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. त्या ग्रुपला मी देवेंद्रजींना घेऊन गेले होते. त्यावेळी जयदीप राणाचा पंटरचा काही रेकॉर्ड देखील नव्हता, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. या गाण्यात बाॅलिवूडचे अनेक कलाकार आहेत. त्यात मी आणि देवेंद्र फडणवीस देखील आहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

दरम्यान, नवाब मलिकांनी अमृता फडणवीस आणि एका व्यक्तीचा फोटो शेअर केला. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ड्रग्ज पेडलर जयदीप राणा असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केल्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी मलिकांवर हल्लाबोल केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते तर…”

केंद्र सरकारची दिवाळी! जीएसटी संकलनात तब्बल ‘इतक्या’ कोटींची वाढ

भारताच्या पराभवाचा पाकड्यांना आनंद! लाईव्ह कार्यक्रमात वसिम-वकार नाचले; पाहा व्हिडीओ

‘त्या’ अँथममधून जयदीप राणाचं नाव वगळलं; नवाब मलिकांचा दावा

“वाघ डरकाळी फोडू शकतो हे त्यांनी दाखवून द्यावं”

‘चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?’; अमृता फडणवीसांचा सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More