बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एनसीबी एवढी मोठी एजन्सी पण गांजा आणि तंबाखूतील फरक कळत नाही”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेचा सपाटा लावला आहे. एनसीबी पथकाने कॉर्डेलिया क्रुझवर केलेल्या कारवाईनंतर नवाब मलिकांनी आज तिसरी पत्रकार परिषद घेतली. ‘एनसीबीची आणखी एक पोलखोल’ या विषयावर नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेतली.

नवाब मलिक काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. या पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिकांनी एनसीबीवर जोरदार निशाणा साधला आहे. मलिक यांनी त्यांच्या जावयावर झालेल्या कारवाईबद्दल बोलत त्यांना विनाकारण या ड्रग्ज प्रकरणात गोवलं गेलं असल्याचा आरोप केला आहे. मलिकांचे जावई ड्रग पेडलर आहेत, म्हणत एनसीबीने समीर खानला या प्रकरणात अडकवल्याचा दावाही मलिकांनी केला आहे.

दरम्यान, एनसीबीच्या कारवाईत 200 किलो गांजा सापडल्याचं सांगण्यात आलं. पण हा गांजा नसून हर्बल तंबाखू असल्याचं अहवालात नमूद आहे. माझ्या जावयाच्या कार्यालयातून गांजा जप्त केल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं मलिक म्हणाले. तर एनसीबी एवढी मोठी एजन्सी पण गांजा आणि तंबाखूतील फरक कळत नाही, अशी खोचक टीकाही नवाब मलिकांनी केली आहे.

13 जानेवारीला समीर खानला अटक झाली. भाजपचे नेते नवाब मलिक यांचे जावई ड्रग डिलर आहेत अशा बातम्या सांगत बदनामी करत होते. पण 27 तारखेला NDPSच्या स्पेशल कोर्टानं माझा जावई समीर खान आणि इतर दोघांना जामीन दिला. एनसीबीच्या या कारवाईमुळे त्यांची मुलगी आणि तिच्या दोन्ही मुलांवर परिणाम झाला, ते घराबाहेर पडत नसल्याचं देखील मलिकांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

आयपीएल दरम्यान मराठी स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट ‘महास्पोर्ट्स’ला जबरदस्त प्रतिसाद

विमानाचं इंधन होणार स्वस्त; ‘या’ राज्याकडून करामध्ये मोठी कपात

देशातील कोरोना रूग्णांसह मृतांच्या संख्येतही वाढ, पाहा ताजी आकडेवारी

“महाराजांच्या घोड्यावर बसून गाढवपणा, या कृत्यानंतर मग बाबरसेना काय करणार?”

कब्बडी खेळताना, नाचताना दिसल्या प्रज्ञा सिंह ठाकूर; सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More