बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांच्या घराची रेकी करणारे नेमके कोण?, मलिकांनी फोटो ट्विट करत…

मुंबई | अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे क्रुझ ड्रग्ज प्रकरण महाराष्ट्रात गाजल्यापासून चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवाय त्यांनी एनसीबी अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपानंतर तर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खंडणी वसुली आणि खोटे कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी केला होता.

नवाब मलिक यांनी ट्विट करत आता काही लोक त्यांचा पाठलाग करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी 2 व्यक्ती आणि एका गाडीचा फोटो ट्विट करून यांना कोणी ओळखत असेल तर मला सांगा असं म्हटलं आहे. मलिकांच्या घराची आणि शाळेची हे लोक रेकी करत असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मलिकांनी या दोन व्यक्तीचे आणि गाडीचे फोटो ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. सध्या नवाब मलिकांच्या या ट्विटचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.

नवाब मलिकांनी ट्विटमध्ये पुढे असं म्हटलं आहे की, या फोटोमध्ये असणाऱ्या लोकांना जी माहिती हवी आहे त्यासाठी त्यांनी थेट मला येऊन भेटावं मी सर्व माहिती त्यांना देतो. सध्या या ट्विटमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत? हाच प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणात पुढे आणखी काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

थोडक्यात बातम्या

संप मिटण्याची शक्यता! कर्मचारी आणि सरकारमध्ये चर्चेस पुन्हा सुरूवात

मोठी बातमी! कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटूंबियांना राज्य सरकारची मदत जाहीर

“जेव्हा मुंबईत हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते”

“23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता…”

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More