बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मलिकांनी ट्विटरवर मध्यरात्री फोडला बाॅम्ब, समीर वानखेडेंचा ‘तो’ फोटो केला शेअर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवाब मलिक विरूद्ध समीर वानखेडे असा वाद चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यातच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही. शिवाय त्यांनी वेळोवेळी वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा करत अनेक कागदपत्रे ट्विटरवर शेअर केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, नवाब मलिकांनी शेअर केलेल्या कागदपत्रांनंतर आता मध्यरात्री त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिकांनी काल मध्यरात्री ट्विटरवर समीर वानखेडे यांचा फोटो टाकला आहे. त्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे मुस्लिम वेशात स्पष्टपणे दिसून येत आहेत.

समीर वानखेडेंचा मुस्लिम वेशातील फोटो शेअर करत नवाब मलिकांनी कबूल, कबूल, कबूल असं ट्विटरवर लिहिलं आहे. समीर वानखेडे व त्यांचे कुटूंबीय वारंवार आपण मुस्लिम नसल्याचा दावा करत आहेत. तसेच त्यांनी अनेकवेळा याबाबत खुलासाही केला आहे. पण नवाब मलिकांनी शेअर केलेल्या फोटोमुळे आता अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी टाकलेल्या फोटोमुळे आता समीर वानखेडेंच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. तसेच या प्रकरणात आता पुढे आणखी काय होणार?, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील कोरोनाला आला आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

पुण्याच्या महापौरांच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘इथं’ ठरले लखपती!

“केबल कनेक्शन देण्याइतकं परबांना एसटीचं काम सोप्प वाटतं का?”

“वाह रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल”

मुंबईतील कोरोना आला आटोक्यात, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More