Top News विधानसभा निवडणूक 2019

नवाब मलिकांना महा’शिव’आघाडी नावावर आक्षेप, कारण…

मुंबई | राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्तास्थापन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तिघांच्या आघाडीला माध्यमांनी महाशिवआघाडी असं नाव दिलं आहे. मात्र, या नावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येत असल्याने त्यांना महाशिवआघाडी नावं देणं चुकीचं आहे. कारण आतापर्यंत जिथे कुठे आघाडी झाली तिथे कुठल्या एका पक्षाचं नाव त्यात आलं नाही. त्यामुळे महाशिवआघाडी हे नाव बरोबर नाही, असं ते म्हणाले आहेत.

पुलोद, संयुक्त पुरोगामी आघाडी, लोकशाही आघाडी अशी नावं देण्यात आली आहेत, असं सांगत नवाब मलिकांनी महाशिवआघाडी नावावर आक्षेप घेतला आहे. कुठल्या एका पक्षाचं नाव त्यात असू नये, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना प्रयत्नशील आहेत. मात्र, वरिष्ठ पातळीवर निर्णय होत नसल्यानं सरकार स्थापन होण्यास वेळ लागत असल्याचं बोललं जातंय.

 

 

सर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, माणिकबाग, पुणे

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या