Loading...

दहीहंडी साजरी करू नका; पूरग्रस्तांना मदत करा- नवाब मलिक

मुंबई |  दहीहंडी सण तोंडावर येऊन ठेपलाय. परंतू पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर जिल्ह्यावर पूराचं संकट ओढावलंय. अशा परिस्थितीत एक सजग नागरिक म्हणून दहीहंडी सण साजरा करणं योग्य नाही. अनावश्यक खर्चांना फाटा देणं थांबवूया आणि तिच मदत आपण आपल्या बांधवांसाठी देऊया, असं आवाहन मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी केलं आहे.

माणुसकीच्या दृष्टीने आपण आपलं कर्तव्य पाळूया. आपल्या बांधवांना कुठेही एकटं वाटणार नाही. संकटाच्या काळात मदत करणं हेच जिवंत असण्याचं लक्षण असतं. तेच कर्तव्य आपण पाळूया, असं मलिक म्हणाले आहेत.

Loading...

मुंबईतल्या अनेक दहिहंडी मंडळांनी सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या महापूराच्या पार्श्वभूमीवर आपल्या भव्य दहीहंडी रद्द केल्या आहेत.

दरम्यान, सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरूच आहे. मात्र पुनर्वसनाचं मोठं आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्तांसाठी वस्तू नेणाऱ्या टेम्पोला कराडजवळ अपघात

-महापालिकेचे 58 हजार कोटी फिक्स डिपॉझिट मात्र दर पावसाळ्यात मुंबई तुंबते- नितीन गडकरी

-नरेंद्र मोदींच्या ‘या’ सल्ल्यावर असदुद्दीन ओवैसी भडकले!

Loading...

-“दबावशाही, झुंडशाही हे तर शिवसेनेचं वैशिष्ट्य”

-सैफ अली खानने स्मिता तांबेला दिली शाबासकी, म्हणाला…

Loading...