राफेल प्रकरणी शरद पवारांनी मोदींना क्लीन चीट दिलेली नाही- राष्ट्रवादी

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल डील प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिलेली नाही. माध्यमांनी पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

केंद्र सरकारनं राफेलच्या खरेदी किमतीबाबत खुलासा करावा आणि या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. 

दरम्यान, शरद पवारांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राफेलच्या गुणवत्तेवर शंका नसल्याचं म्हटलं होतं. संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी आणि किंमतीचा खुलासा करावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. तांत्रिक माहिती देण्याचा आग्रह विरोधकांनी धरु नये, असंही ते म्हणाले होते. 

महत्त्वाच्या बातम्या-

-राजे माझ्या स्वप्नात आल्यामुळेच मी सभेला हजेरी लावली!

तनुश्रीच्या आरोपानंतर नानांची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले?

-वेळ पडली तर कोंबड्यालाही अंड द्यावं लागेल- रावसाहेब दानवे

-जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं ते आज पुर्ण होत आहे- मुख्यमंत्री

-राफेलवरची पवारांची भूमिका देशहिताची; राहुल गांधींनी त्यांचा आदर करावा- अमित शहा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या