Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

“भीमा कोरेगावची दंगल सुनियोजित; शरद पवार आयोगासमोर साक्ष देतील”

मुंबई |  भीमा कोरेगावची दंगल सुनियोदित होती, अशी पहिल्या दिवसापासूनची राष्ट्रवादीची भूमिका आहे, असं म्हणत लेखी पत्राद्वारे शरद पवार यांनी आयोगाकडे म्हणणं मांडलं आहे, असं राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

चौकशी आयोगाने शरद पवार यांच्याकडे वेळ मागितली होती त्यानुसार येत्या 4 एप्रिल रोजी शरद पवार आयोगाकडे साक्ष देणार आहेत, असंही मलिक यांनी सांगितलं आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावण्यात आलं आहे. कोरेगाव भीमा आयोगाकडून हे समन्स बजावण्यात आलं असून 04 एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पुण्यात 2018 साली भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची कारणं आयोगाकडून तपासली जात असून त्याच पार्श्वभूमीवर हे समन्स बजावण्यात आलं आहे. यावेळी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. कोरेगाव भीमा प्रकरणी पवारांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी आयोगाकडे केली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

परदेशातून परतलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात राहणं अनिवार्य करा- मुरलीधर मोहोळ

कोरोनाने उभी बाटली केली आडवी; 31 मार्चपर्यंत पुण्यातली दारूची दुकाने बंद!

महागडे सॅनिटायझर खरेदी करू नका आणि मास्कही वापरू नका; तुकाराम मुंढेंनी सांगितल्या सोप्या टिप्स

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या