मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतने देशाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी तिने केलेल्या वक्तव्यांवरून धारेवर धरलं आहे. त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत इतर अनेक मुद्द्यांबरोबरच कंगणालाही लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं.
मलिकांनी कंगणाला “लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही होगया है” असा खोचक टोला लगावला आहे. शिवाय “कंगणाचा पद्मश्री काढून घेण्यात यावा आणि या अभिनेत्रीने करोडो भारतवासीयांचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करावा.” अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
मलिक पुढे म्हणाले, 1857 पासून देशात स्वातंत्र्याचं आंदोलन सुरु झालं आहे. त्यामध्ये लाखो लोकांनी प्राणांची आहुती दिली आहे. गांधीनी मोठा लढा दिला आहे. अखेर ब्रिटीशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. त्यावर एक अभिनेत्री मलाणा क्रिम घेऊन ओव्हर डोस झाल्यावर काहितरी बोलत आहे. असा खोचक टोला मलिकांनी लगावला आहे.
दरम्यान कंगणा राणावतने एका मुलाखतीमध्ये 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक दिल्यासारखं होतं. देशाला खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर कंगणाच्या वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते वरूण गांधी यांनीही कंगणावर ट्विट करून निशाणा साधला आहे.
पाहा ट्विट-
कभी महात्मा गांधी जी के त्याग और तपस्या का अपमान, कभी उनके हत्यारे का सम्मान, और अब शहीद मंगल पाण्डेय से लेकर रानी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद, नेताजी सुभाष चंद्र बोस और लाखों स्वतंत्रता सेनानियों की कुर्बानियों का तिरस्कार।
इस सोच को मैं पागलपन कहूँ या फिर देशद्रोह? pic.twitter.com/Gxb3xXMi2Z
— Varun Gandhi (@varungandhi80) November 11, 2021
थोडक्यात बातम्या-
भाजपच्या माजी मंत्र्यावर नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप!
“लाज लज्जा असेल तर कंगणाने देशाची माफी मागावी”
महाराष्ट्रातून महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार- जे. पी. नड्डा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती!
“कंगणाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या”
Comments are closed.