बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, अखेर शेतकऱ्यांनी करून दाखवलं”

मुंबई | केंद्र सरकारने आणलेल्या तीन जाचक कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून आंदोलन पुकारलं. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यात आले असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता सगळ्याच स्तरांवरून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे.

राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, तीन कृषी कायदे अखेर मागे घेण्यात आले. देशाच्या शेतकऱ्यांना माझा सलाम आणि शहिद शेतकऱ्यांना माझं अभिवादन, अशी प्रतिक्रिया नवाब मलिकांनी दिली आहे.

तर नवाब मलिक यांनी आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेतही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिले, कितीही प्रयत्न केला तरी ते मागे हटले नाहीत. त्यांच्यावर लाठीचार्ज केला, आतंकी असल्याचा आरोप केला पण तरीही त्यांनी सात वर्षांत पहिल्यांदाच मोदींना झुकवण्याचं काम केलं, असं म्हणत मलिकांनी सगळ्यात आधी शेतकरी बांधवांचं अभिनंदन केलं.

निवडणूका जवळ आल्या तसं भाजपला हारण्याची भीती वाटू लागली आणि म्हणून हरण्याच्या भीतीने पंतप्रधान मोदींनी तिन्ही कायदे मागे घेतले, असं मत नवाब मलिकांनी व्यक्त केलं आहे. देशातील शेतकरी महान आहेत, त्यांनी मोदीजींना झुकवलं. शेतकऱ्यांनी दाखवून दिलं की देश एकजूट असेल तर कोणताही निर्णय बदलता येतो, असंही नवाब मलिक म्हणाले आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

मोदी सरकार अखेर झुकलं; तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

मोठी बातमी! एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या

“स्तनांना कपड्यांवरुन स्पर्श असला तरी तो लैंगिक अत्याचारच”

“ठाकरे सरकार हे काळीज नसलेलं सरकार आहे”

“एसटी कर्मचारी उपाशीपोटी अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More