बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आ देखे जरा…’; प्रविण दरेकरांच्या ‘त्या’ ट्विटवर मलिकांचं खास शैलित प्रत्युत्तर

मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काल ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला असल्याचं म्हटलं होतं. त्यातच त्यांनी मलिकांकडून उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडून वेळ मागण्यात आल्याचाही उल्लेख केला होता.

दरम्यान, ट्विटरवर त्यांनी व्हिडीओसह पोस्ट करून ही माहिती दिली होती. या प्रकरणात आता नवाब मलिकांनी प्रविण दरेकरांना प्रत्युत्तर दिलं आहे. आज सकाळी हे ट्विटर युद्ध पेटलं असल्याचं पाहायला मिळत आहे. मलिकांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ‘आ देखे जरा, किसमे कितना है दम’, असं बोलून प्रविण दरेकरांचं ते ट्विट रिट्विट केलं आहे.

नवाब मलिकांनी प्रविण दरेकरांना थेट आव्हान दिल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच मलिकांनी आपल्या खास शैलित दरेकरांवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या क्रुझ ड्रग्ज प्रकरणात केलेल्या टीकेमुळे आणि आरोपांमुळे नवाब मलिका चांगलेच चर्चेत आले आहेत.

दरम्यान, नवाब मलिकांनी केलेल्या ट्विटवर आता प्रविण दरेकरांकडून काय प्रत्युत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या ट्विटनंतर आता राजकीय गोटात चर्चा रंगू लागल्या असून हे प्रकरण पुढे नेमकं काय वळण घेणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीचा फडणवीसांना पश्चात्ताप, म्हणाले मी पुस्तक लिहून…

‘…आणि दुसरीकडे अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षदा’

पुणेकरांवर पुन्हा निर्बंध! नियम पुन्हा ‘जैसे थे’च

‘त्या’ व्हायरल डान्स व्हिडीओवर होणाऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

1ली ते 4थी शाळा राहणार बंद?, ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More