बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री…; राष्ट्रवादीचं राजनाथ सिहांना सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई |  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चाललीये, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर प्रहार केला. त्यांच्या टीकेला ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला ‘सर्कस’ म्हणतात, अशा शब्दात महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगलं काम करत आहे. कोरोनाबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने कौतुक केले आहे. राजनाथ सिंहजी, रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला ‘सर्कस’ असे संबोधतात. अनुभवाचे बोल… असं ट्विट करत त्यांनी राजनाथ सिंह यांच्यावर पलटवार केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडे जे विकासाचं व्हिजन असायला हवं ते अजिबातच नाहीये. महाराष्ट्राकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की या राज्यात सरकारच नाहीये. परंतू असं असलं तरी सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, महाराष्ट्रात ज्या प्रकारे कोरोनाचा उद्रेक होतो आहे, तो चिंतेचा विषय आहे, अशी टीका करत अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारला जी कोणती मदत लागेल ती मदत केंद्र सरकार करेल, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

….म्हणून मला शिवभक्तांचा सार्थ अभिमान, त्यांच्या समोर मी नतमस्तक- छत्रपती संभाजीराजे

काँग्रेसचं ठरलं… कोरोनासोबत जगायचं! कार्यालयीन कामकाज पुन्हा सुरु पण लोकांना प्रवेशासाठी ‘ही’ अट

महत्वाच्या बातम्या-

शरद पवार कोकण दौऱ्यासाठी रवाना; थोड्याच वेळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेणार भेट

महाराष्ट्राने कोरोनाची लढाई कशी लढावी ते कर्नाटक आणि उ. प्रदेशकडून शिकावी- राजनाथ सिंह

‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ सचिन वाझे 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिसात दाखल, इथं आहे नेमणूक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More