बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी भाजप नेत्यांपुढे हात जोडतो पण तुम्ही….- नवाब मलिक

मुंबई | आर्यन खानच्या अटकेपासून राज्यात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे असा वाद रंगलेला दिसत आहे. या प्रकरणात नवाब मलिकांनी अनेक खुलासे करत समीर वानखेडे त्यांच्याशी आणि एनसीबी संबंधित काही सदस्य आणि भाजप नेत्यांवरही निशाणा साधला.

आर्यन खान प्रकरणात पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांनी अनेक गौप्यस्फोट केले. भाजप नेत्यांवरही आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी चक्क हात जोडतो म्हणत भाजप नेत्यांना विनंती केली आहे, पण समीर वानखेडेंवर मात्र जोरदार हल्लाबोल केला आहे.

समीर वानखेडे, आशिष रंजन, व्ही व्ही सिंग आणि अनिल माने ही एनसीबीमधील चांडाळचौकडी आहे. हीच चौकडी संपूर्ण यंत्रणेची बदनामी करत आहे. एनसीबीनं हे घाणेरडे मासे फेकुन द्यावे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. मलिक पुढे म्हणाले की, ड्रग्जचं उच्चाटन झालं पाहिजे पण ही चांडाळचौकडी एनसीबीत असेपर्यंत ड्रग्ज बंद होणार नाहीत.

तर मी एनसीबी किंवा भाजपच्या विरोधात लढत नाही. मी निष्पाप लोकांची फसवणुक करणाऱ्या आणि चुकीच्या लोकांविरोधात लढतोय. त्यामुळे तुम्ही फ्रॉड लोकांची पाठराखण करू नका. समीर वानखेडे सारख्या भ्रष्ट व राजकीय पक्षाच्या नावाने चुकीचे धंदे करणाऱ्या मोहित कंबोज, सुनील पाटील, मनीष भानूशाली सारख्या लोकांना वाचवू नका, असं आवाहन मलिकांनी भाजप नेत्यांना केले आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका

“नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा”

“नवाब मलिकांना हे आजच कसं सुचलं? एक महिना काय झोपले होते का?”

‘क्रुझ पार्टीसाठी महाविकासआघाडी सरकारमधील ‘या’ मंत्र्यालाही निमंत्रण’; मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड- नवाब मलिक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More