मुंबई | गुरूवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधी आंदोलन सुरू असताना रामभक्त वर्मा नावाच्या तरूणाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
आंदोलकांना गोळी मारा असं वक्तव्य भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं होतं आणि कालच जामियामध्ये गोळीबाराची घटना घडली. भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमुळे देशातील वातावरण बिघडतंय, असं म्हणत अजूनही देशात गोडसेंची मानसिकता जिवंत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तरूणाने केलेल्या गोळीबारात एक आंदोलक जखमी झाला असून त्याला रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने समाजाच्या विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय.
दरम्यान, या घटनेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप नेते हिंसेला उकसवत असतील तर अशा घटना घडणारच, अशी टीका नेत्यांनी केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून होणार सत्कार!
महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार- देवेंद्र फडणवीस
महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंचं विद्युत आयोगाला पत्र; बेस्टच्या वीज दरवाढीवर मनसेचा आक्षेप
रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांच्या गॅदरिंगमध्ये ‘आयटम साँग’वर बंदी
प्रशांत गडाखांचा ‘रंग बरसे’ गाण्यावर भन्नाट डान्स; पाहा व्हिडीओ-
Comments are closed.