Top News

संजय राऊतांना नवाब मलिक म्हणतात…अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं!

मुंबई | सितारों के आगे जहाँ और भी हैं अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं, असं शायर इकबाल यांचा शेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे. विशेष म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांना मलिकांनी ट्विटमध्ये टॅग केलं आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यानंतर या तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी आपल्या मित्रपक्षातल्या नेत्यांशी असलेल्या मैत्रीचे दाखले देण्यास सुरूवात केली आहे. राऊतांनी मलिकांनी टॅग केल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

संजय राऊत यांची गेल्या दिवसांपासून ट्वीटरवर ट्वीटची मालिका सुरू आहे. त्यांच्या या ट्वीटच्या मालिकेला अनेकांचा प्रतिसाद मिळतोय. नवाब मलिक यांनीही ट्वीट करत आपल्या वैयक्तिक मैत्रीला आणि पक्षीय मैत्रीला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, काल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेनं राहुल गांधींच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे मलिकांच्या या ट्विटला महत्त्व प्राप्त झालं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या