Top News विधानसभा निवडणूक 2019

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याविषयी अजून काही ठरलं नाही- नवाब मलिक

मुंबई |  मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपद याविषयी काहीही ठरलं नाही.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मिळून याबाबत चर्चा करतील आणि काय तो निर्णय घेतील, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलं आहे. ते टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

महाशिवआघाडीचे सरकार आल्यास शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यात येईल, असं वक्तव्य नवाब मलिक यांनी यापूर्वी केलं होतं. मात्र, आता त्यांनी यावर भाष्य करण्याचं टाळलं आहे. दोन्ही पक्षातील नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील, असं ते म्हणाले आहेत.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यासंबंधी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पवारांनी म्हटलं होतं. आता नवाब मलिकांनीही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याविषयी भाष्य केलं नसल्यानं चर्चा होऊ लागल्या आहेत.

दरम्यान, भाजपनं मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिल्यानं शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक केली आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांचं जुळून आल्यास राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येऊ शकतं.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या