मुंबई | खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांची नाव असल्याचं बोललं जात होतं. मात्र या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापू लागल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नबाव मलिक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही. कुणाचे मुडदे कुठेही पडू शकतात अशी स्थिती आहे, अशी टीका नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत केली होती. त्यामुळे राणे लवकरच केंद्रातील नेत्यांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असल्याचं बोललं जात आहे. यावर नवाब मलिक यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
राज्यातील जनता महाविकासआघाडी सरकारच्या कामावर समाधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे अशक्य असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तर नारायण राणे यांनी आधी सरकार टिकणार नाही,फाटाफूट होऊन भाजपची सत्ता येईल, असं म्हटलं होतं मात्र जवळपास 15 महिने झाल्यानंतर त्यांनी हा बाजा वाजवणं बंद केलं असल्याचं म्हणत मलिक यांनी राणेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, आता ते पुन्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहेत. कारण भाजपकडे दुसरा पर्याय नाही पण हे अशक्य आहे. कोणत्याही राज्यात अशीच कुणालाही राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘राज ठाकरेंच्या ‘त्या’ आवाहनामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला’, पोलिसात तक्रार दाखल
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परदेशात जायला वेळ पण…’; शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र
मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा म्हणाले; ‘माता, माती आणि माणूसकी…’
काय सांगता! खेकडा चक्क सिगरेट ओढतोय; ‘हा’ व्हिडीओ पाहून सारं जग झालंय थक्क
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात नियमांना धाब्यावर बसवुन चित्रपटाचं शूटिंग; मनसेचे गंभीर आरोप
Comments are closed.