बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चाणक्य समजणाऱ्यांना मात देणारे चाणक्य म्हणजे पवारसाहेब”

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी देशात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. अशातच आता नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आम्ही ममतादीदींसोबत राहणार की काँग्रेससोबत राहणार, अशी चिंता आता काहीजणांना वाटतीये. परंतु जे स्वत:ला चाणक्य समजत होते, अशा चाणक्य समजणाऱ्यांना मात देणारे चाणक्य म्हणजे पवारसाहेब आहेत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येतील असे कधी कुणी स्वप्नातही पाहिले नव्हतं तशीच परिस्थिती आता या देशात होणार आहे, असा सुचक इशारा देखील मलिकांनी यावेळी दिला आहे.

असे बरेच लोक आहेत, जे कधी सोबत येणार याची कधी चर्चा होत नाही. परंतु या सगळ्याची मोट बांधण्याचं काम हे शरद पवार करतील, असंही मलिक म्हणाले आहेत. कोणालाही बाहेर काढून ही आघाडी होणार नाही. यात सगळ्यांचा समावेश करायचा आहे. त्यादृष्टीने आपण काम करायचं आहे, असंही मलिक यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवारांच्या आणि ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसतंय. काँग्रेसने जिग्गज नेते आता राष्ट्रवादीविरूद्ध दंड थोपटताना दिसत आहेत. त्यामुळे आता आघाडीत बिघाडी होणार का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

थोडक्यात बातम्या-

“R.R.Patil यांनी चोख काम केलं होतं, आता अभद्र युती तोडण्याची गरज”

च्युइंगम खाल्ल्याने कोरोना रोखता येतो?, शास्त्रज्ञांनी केला ‘हा’ दावा

मिर्झापूर वेब सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, बॅालिवूडमध्ये खळबळ

“2024 ला मोदीच सत्तेत येणार, लोकं मोदींवरच विश्वास ठेवणार”

मोठी बातमी! भारतात Omicron ची एन्ट्री, ‘या’ राज्यात आढळले रूग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More