बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वानखेडे आणि कंबोज यांची भेट तर…; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

मुंबई | एनसीबीने कॉर्डेलिया क्रुझवर कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईनंतर राजकीय आणि मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ उडाली. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या या पथकाने कारवाई केली होती. या कारवाईची सगळीकडे चर्चा होत असताना ही कारवाई बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना केला होता. यानंतर मलिक आणखी एक गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत आहेत.

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवाब मलिक यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मलिक म्हटले होते की, क्रुझवर 11 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यातील 3 जणांना सोडून देण्यात आलं. यामध्ये ऋषभ सचदेवचा देखील समावेश आहे. ऋषभ हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचा मेहुणा आहे. इतकंच नाही तर त्याच्या सुटकेसाठी भाजपकडून दबाव टाकला गेला असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता.

तर मलिक पुन्हा एकदा गौप्यस्फोट करणार आहेत. ते म्हणाले की, या प्रकरणात कंबोज यांनी नेमकं काय केलं ते मी समोर आणणार. कंबोज आणि वानखेडे यांची 7 ऑक्टोबरला भेट कुठे झाली मला माहिती. त्याचा व्हिडीओ मी लवकरच रीलीज करणार आहे. केवळ हेच नाही तर रिया चक्रवर्तीसह अनेक बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात आलं त्याचा पर्दाफाशही मी करणार आहे. बॉलिवूड आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र चालू असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केला.

या सगळ्यामागे भाजप आहे. एका अधिकाऱ्याला हाताशी धरून त्याच्या माध्यमातून सर्व कारवाया केल्या जात आहेत. माझा दावा आहे, येत्या काळात मी अनेक व्हिडीओ माध्यमासमोर आणणार, असा दावाही नवाब मलिकांनी केला आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेले हे सर्व आरोप मोहित कंबोज यांनी फेटाळून लावले आहेत. समीर वानखेडे कसे दिसतात हे पण मी आजवर पाहिलं नाही. त्यामुळे भेटीचा प्रश्न तर लांबच राहिला, असं म्हणत कंबोज यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

आमदार रवी राणांच्या अडचणी वाढल्या; आमदारकी धोक्यात?

‘मुंबई क्रुझ प्रकरण पुर्णपणे खोटं, शाहरूख खान त्यांच्या निशाण्यावर’; शत्रुघ्न सिन्हा संतापले

“शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली”

विराटचं स्वप्न भंगलं! रोमांचक सामन्यात कोलकाताचा बंगळुरूवर दणदणीत विजय

वाह छेत्री वाह! सुनिल छेत्रीने केली महान फुटबॉलपटू पेलेच्या व्रिकमाची बरोबरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More