Top News महाराष्ट्र मुंबई

‘कुणीही कितीही टरटर केली तरी…’; नवाब मलिकांचा भाजपला टोला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. या टीकेला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपला टोला लगावलाय.

कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही, असा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

सभ्य समाजात आणि राजकारणात असंसदीय शब्दांचा प्रयोग होत असेल तर तो चुकीचा आहे. प्रत्येकाने मर्यादेत राहून भाषेचा प्रयोग केला पाहिजे, असा सल्लाही मलिक यांनी दिला.

भाजपचे काही नेते मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत अपशब्द वापरत आहेत. आणि एक मंत्री तुरुंगात जाणार असल्याचे भाकीत करत आहेत हे बोलणं योग्य नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“ना जीडीपी कळतो, ना अर्थव्यवस्था, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय”

कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त! आरोग्यमंत्र्यांनी निश्चित केले नवे दर, जाणून घ्या!

संजय राऊत म्हणजे विदूषक, कोणत्या धुंदीत आहात?- नारायण राणे

बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून गप्प बसलोय, आमच्याकडे नजर फिरवू नका नाहीतर…- नारायण राणे

“सुशांतची केस अजून संपलेली नाही, आदित्य ठाकरे खुनाच्या आरोपाखाली गजाआड जाणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या