Top News महाराष्ट्र मुंबई

“राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात, त्यामुळे पोपटासारखं तर बोलणारचं ना…”

मुंबई | महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार जेमतेम सप्टेंबर महिन्यांपर्यंत चालेल, असा दावा वरिष्ठ भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. त्यांच्या दाव्यावर राष्ट्रवादीने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री नबाव मलिक यांनी नारायण राणे यांच्या दाव्याला खास शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. (Ncp Nawab Malik Answer Bjp Narayan Rane)

नारायण राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले आहेत. पोपटासारखं कागद काढून लोकांना भविष्य सांगणारा जो पक्ष आहे त्या पक्षात त्यांचा प्रवेश झाल्यानंतर ते देखील पोपटासारखे बोलणारचं ना… अशा तिखट शब्दात नवाब मलिक यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Ncp Nawab Malik Answer Bjp Narayan Rane)

भविष्यवाणी करून राजकारण कधी चालत नाही. राजकारणात नंबर गेम असतो. त्यामुळे पोपटाने चिठ्ठ्या काढल्या आणि तसंच घडलं असं कधी होत नाही. भाजपमध्ये पोपटगिरी करणारे अनेक लोक आहेत.परंतू चिठ्ठ्यांवर सरकार चालत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असं मलिक म्हणाले. (Ncp Nawab Malik Answer Bjp Narayan Rane)

दरम्यान, येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच ठाकरे सरकार राहिल. सरकारमध्ये समन्वय नसल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये एकमत दिसत नाही त्यामुळे लवकरच हे सरकार सत्तेत जाईन, अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

सप्टेंबरपर्यंतच ठाकरे सरकार राहिल, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

रामदेव बाबांची आता आयपीएलमध्ये उडी, उचलणार मोठं पाऊल?

मंत्री विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

‘ऑपरेशन लोटस’ इथे शक्य नाही’, संकट काळात सोडून गेले नाही ते आता कसे जातील?- नवाब मलिक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या