बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्रजी पवार साहेबांवर टीका करतात आणि चमत्कार घडतात, 2024 मध्येही..”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल त्यांचा 81वा वाढदिवस साजरा केला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात शरद पवार पंतप्रधान झाले पाहिजेत असा सूर उमटला होता. या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती.

‘शरद पवार यांचा पक्ष तयार झाला तेव्हापासूनच ते पंतप्रधान व्हावे असं त्यांचं स्वप्न आहे. स्वप्न बघणं काही वाईट नसतं’, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांच्या या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.

‘विधानसभा निवडणुकीच्या आधीही पवार साहेबांचं राजकारण संपल्याचं त्यांनी सांगितलं होतं. देवेंद्रजी पवार साहेबांवर टीका करतात आणि चमत्कार घडतात’, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. तर 2024मध्येही आम्ही चमत्कार घडवून आणू, असंही नवाब मलिक (Nawab Malik) म्हटले आहेत.

दरम्यान, ‘पवार साहेब देशातील सर्व राजकीय पक्षांना एकजूट आणण्यासाठी काम करतील आणि विरोधकांच्या एकजूटीमुळे मोदी सरकार सत्तेच्या बाहेर जाईल’, असंही असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत. तर अमृत पिऊन कोणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्रजींना कळालं पाहिजे, असा टोलाही मलिकांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

किरीट सोमय्या लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट; ‘हे’ घोटाळे करणार उघड

“…म्हणून ‘या’ मार्गानं माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय”

“शरद पवारांचा पक्ष बनला तेव्हापासूनच ‘ते’ पंतप्रधान पदाचं स्वप्न बघत आहेत”

तब्बल 21 वर्षांनी भारतानं जिंकला Miss Universeचा खिताब; ‘ही’ व्यक्ती ठरली मानकरी

‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावरुन संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल, भाजपचा आक्रमक पवित्रा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More