नवाब मलिकांना सोडविण्यसाठी मागितली ‘इतक्या’ कोटींची लाच, मलिकांच्या मुलाचा धक्कादायक खुलासा
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवाब मलिक हे सध्या आर्थर रोड तुरूंगात आहेत. त्यातच आता नवाब मलिकांच्या सुटकेसाठी तीन कोटी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात नवाब मलिकांच्या मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, त्यासाठी तीन कोटी द्यावे लागतील, अशी मागणी नवाब मलिकांच्या कुटूंबियाकडे करण्यात आली होती. नवाब मलिक यांचा मुलगा आमिर मलिक याने विनोबा भावे पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. इम्तिाज या व्यक्तीने तीन कोटी रूपयांची मागणी केली आहे.
इम्तिाज या व्यक्तीने तीन कोटी रूपये मागितले असून ते बिटकॉईनच्या स्वरूपात देण्यात यावेत, असंही म्हटलं होतं. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात तपास केला असता दुबईहून कॉल आल्याचे समोर आलं आहे. नवाब मलिकांना दाऊदच्या कुटूंबाशी संबंधितांकडून जमीन खरेदी केल्याचे आरोप आहेत.
दरम्यान, नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने 15 मार्चला नवाब मलिकांची याचिका फेटाळली होती. नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजपकडून राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातच आता ईडी कोठडीतून सुटका करण्यासाठी नवाब मलिकांच्या कुटूंबियाकडून 3 कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
चहा महागला! आता ‘इतक्या’ रुपयांना मिळणार चहा, वाचा नवे दर
ऑनलाईन क्लासेसचे लहान मुलांवर होतायेत दुष्परिणाम, तज्ज्ञांनी सुचवले ‘हे’ उपाय
कधीही लाॅकडाऊन न लागलेल्या देशात कोरोनाचा उद्रेक, समोर आली धक्कादायक आकडेवारी
सर्वात मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून होळीचे सगळे निर्बंध मागे
“मुलीवर लैंगिक अत्याचार करताना तीनं अंतर्वस्त्र घातली असली तरी…”; न्यायालयाचा मोठा निर्णय
Comments are closed.