औरंगाबाद | बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. यावर मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
कोरोना लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देत आहे की निवडणुका जिंकण्यासाठी देत आहे, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
भाजप निवडणूक हरली तरी या देशातल्या लोकांना लस मोफतच मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला ही लस पूर्ण मोफत दिली जाईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यातून भाजपने सत्ता आल्यास कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
“रोहित पवारांनी समाजकारण नाही तर धंदा केला”
अनेकांना भाजप सोडण्याची इच्छा आहे पण….- एकनाथ खडस
राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा प्रमुख फोडला तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण…- राम शिंदे
मुंबई- सिटी सेंटर मॉलचे दोन मजले जळून खाक; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
Comments are closed.