मुंबई | करूणा शर्मा आणि मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. तसेच आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली, असा मोठा खुलासा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चौकशीनंतरच काय ते समोर येईल, त्यावर फार काही बोलू शकणार नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
एखादी तक्रार झाली तर चौकशी होतच आहे. पण जी आरोप करतेय ती कुठेतरी त्यांची नातेवाईक आहे. करुणा शर्मांच्या बहिणीशी धनंजय मुंडेंनी लग्न केलेलं आहे, दोन मुलंसुद्धा आहेत. याच्या मागे काय कारण आहे ते आता मुंडे साहेबच सांगू शकतील, असं नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत याप्रकरणी खुलासा केला.
थोडक्यात बातम्या-
“…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही”
“मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप”
कोरोना विरोधातील लढाईत नरेंद्र मोदी यांचं काम जगात सर्वोत्तम- देवेंद्र फडणवीस
करुणासोबत सहमतीनं संबंधात; आम्हाला दोन मुलंही आहेत- धनंजय मुंडे
बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांचा अत्यंत धक्कादायक खुलासा