महाराष्ट्र मुंबई

“फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडंही जा”

मुंबई | मनसेप्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेवर मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावं, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा अन्य कुठलेही नेते असोत प्रत्येकाची आस्था असते. या देशात प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे. हा प्रत्येक नागरिकाचा मौलिक अधिकार आहे. त्यामुळे ते त्यांना हवं त्याठिकाणी जाऊ शकतात, असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने आता राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिनेत्री कंगणा राणावत दिसणार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत!

60 वर्षांपासून गुहेत वास्तव्य; राम मंदिरासाठी दान केलेली रक्कम ऐकाल तर हैराण व्हाल!

सातव्या बैठकीत ‘अण्णांचा हट्ट’ मागे; फडणवीसांच्या भेटीनंतर उपोषणाआधीच माघार

उद्धव ठाकरेंकडून फडणवीस सरकारचं कौतुक, म्हणाले…

मोठी बातमी! दिल्लीच्या व्हीव्हीआयपी परिसरात स्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या