बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ व्हायरल व्हीडिओबाबत नवाब मलिकांचं स्पष्टीकरण; म्हणतात…

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सर्व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना नवाब मलिक शांत उभे असल्याचं दिसत आहे. यावर नवाब मलिकांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

2 वर्षापूर्वीचा तो व्हीडिओ आहे. भाजपकडून हा व्हीडिओ व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपला माझी एवढी भिती का वाटते?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

गर्दी असल्याने त्यावेळी मला हात उचलता आला नाही, पण मी तोंडाने जय बोललो होतो, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मनेसे नेते अमेय खोपकर यांनी नवाब मलिक यांचा व्हीडिओ शेअर करत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. तसेच महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा वाटतो का? असा सवालही अमेय खोपकर यांनी केलाय.

ट्रेंडिंग बातम्या- 

राज्य 60व्या वर्षात पदार्पण करतंय अन् मी 80 व्या, या वयात आपण थांबायचं…- शरद पवार

वाघ आहे का बेडूक; मनसेची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

महत्वाच्या बातम्या- 

“वारिस पठाण हे लावारीस पठाण आहेत; समोर आले तर थोबाडीत देईन”

शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मनसेबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाले….

मालिकेतील कोणताच भाग वगळणार नाही; अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More