बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप ही वॉशिंग मशीनसारखी झाली असून इथे डाकू पण साधू होवू शकतो”

मुंबई | भाजप पक्ष वॉशिंग मशीनसारखा झाला आहे या पक्षातसुद्धा डाकूसुद्धा साधू होऊ शकतो, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला टोला हाणला आहे. पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांनी भाजपवर जोरदार टीकेचे बाण सोडले आहेत.

भाजप नेते नारायण राणे हे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या परळ येथील एका इमारतीला ईडीने नोटीस दिल्याच्या बातम्या भाजपने पेरल्या होत्या. याशिवाय नारायण राणे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अहमदाबाद येथे भेटून आल्याचा व्हिडीओ राणे यांनी नकार दिल्यावर भाजपच्या लोकांनी व्हायरल केला होता. त्याचपध्दतीने बंगालमध्ये भाजपने लोक घेतले असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

ईडी, सीबीआय आणि इतर यंत्रणांचा वापर करून अनेक नेत्यांना भाजपात येण्यासाठी भाग पाडले जात आहे किंवा तशी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. त्यासोबतच त्यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची आठवणही करून दिली.

दरम्यान, नितीन गडकरीही वाल्या कोळयाचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचे बोलले होेते, असं नवाब मलिक म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंवर ‘या’ कारणाने गुन्हा दाखल

‘अजित पवारांना उदंड आयुष्य लाभावं, राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत’; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त 30 क्विंटल साखरेचं वाटप

“नदीची दोन टोके केव्हाच एकत्र येऊ शकत नाहीत”

अखेर ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची लढाई यशस्वी; सोमवारपासून उघडणार सर्व दुकानं

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More