बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे सिद्ध होत आहे”

मुंबई | कोरोनाचं संकट असताना तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारट्टीवरील जिल्ह्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे कोकणाला पॅकेज मिळण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका होत आहे. अशातच राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केलं तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल मात्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागलं असल्याचं नबाव मलिकांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र गुजरातला 1 हजार कोटीचे पॅकेज दिले. जनता प्रश्न निर्माण करू लागल्यावर आमच्यावर प्रश्न निर्माण केला जात आहे. आम्ही भरपाई देणारच आहोत पण आधी फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून दिली पाहिजे, असंही नबाव मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र फडणवीस केंद्राकडे आग्रह धरत नाही आणि राज्य सरकार काय देणार यावर फडणवीस बोलत आहेत, असा टोला मलिकांनी लगावला. फडणवीस महाराष्ट्रासोबत आहेत की, भाजप नेत्यांना वाचवायला लागले आहेत हे त्यांनी सांगावं, असा सवालही मलिकांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

पाकिस्तानला भारतीय सैन्याची माहिती पुरवणाऱ्या दोन बहिणींना अटक!

“नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली”

“राज्य सरकार बरखास्त करा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”

मास्क नीट न लावल्यामुळे पोलिसांनी चक्क 18 महिन्याच्या मुलाला केला दंड अन्…

दीराच्या प्रेमात आकंठ बुडाली; त्यानंतर तिनं जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More