बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणून…’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना अनेक मुद्द्यांवर पत्र लिहिलं आहे. यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचं का आणि ते देशाने स्वीकारायचं का?, असे काही प्रश्न केले होते. मात्र यावरून ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सोनिया गांधी यांना महाराष्ट्राच्या बाबातीत पत्र लिहून खोटी बातमी पसरवण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्रात सुरुवातीपासून सरकार गांभीर्यानं काम करत आहे. राज्य सरकारने करोना रुग्ण, मृतांचा आकडा कधीही लपवलेला नाही. महाराष्ट्रात 6200 लॅब तयार करण्यात आल्या, जास्तीत जास्त आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या असून सर्व माहिती उघडपणे लोकांसमोर ठेवत असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

गुजरातमध्ये 71 दिवसांत 61 हजार करोनाच्या केसेस लपवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गोव्यात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून लोकांचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेशात दोन हजार लोकांना नदीत प्रवाहित करण्यात आल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्र चांगली कामं करतंय हे पचत नसल्याने सरकारला बदानाम करण्याचा त्यांचा उद्योगच असेल म्हणून सोनिया गांधींना पत्र लिहून ते बदनामी करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

दरम्यान, जगभरात महाराष्ट्राच्या कामाची, मुंबई मॉडेलची नोंद घेतली जात असताना यांना ही कामं दिसत नसतील तर काही इलाज करु शकत नाही, असंही मलिक यांनी म्हटलं आहे. मलिकांच्या या टीकेवर फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

रिक्षातून कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न, चालकासोबत घडला खतरनाक प्रकार, पाहा व्हिडीओ

कोरोनाचे नियम धाब्यावर; पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

मन सुन्न करणारी घटना; बापाने मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायी चालत स्मशानात नेला, पाहा व्हिडीओ

गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला- पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More