Top News परभणी महाराष्ट्र

“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे आता जोडीने मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहत बसतील”

परभणी | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते नारायण राणे हे मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. परभणीत माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीस आणि राणेंवर निशाणा साधला.

गेल्या 22 वर्षापासून नारायण राणे मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना आता देवेंद्र फडणवीस जोडीदार भेटले आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. फडणवीस वारंवार सरकार पडणार असल्याचं म्हणत आम्ही फासा पलटवणार असल्याचं म्हणतात. यावरूनही नबाव मलिकांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

शिवसेनेशी फारकत घेतल्यापासून भाजपची अवस्था काय आहे हे सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे. मात्र देवेंद्र फडणवीस वारंवार आम्ही भविष्यात फासे फिरवू अशी भाषा करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी ज्योतिष विद्या कुठून शिकली हे आम्हाला माहिती नाही. पण आमचा ज्योतिष विद्येवर विश्वास नसल्याचं नवाब मलिक म्हणाले. याआधी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यममत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीवरही मलिकांनी टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, भाजपचे नेते सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटतात. या भेटीनंतर ते वादग्रस्त वक्तव्य करुन महाविकासआघाडीचे राज्यातील सरकार पाडण्यासाठी वातावरणनिर्मिती करत असल्याचं मलिक म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘…पण भाड्याचं घर शेवटी भाड्याचं असतं’; कंगणा राणावतचा ट्विटरला टोला

‘भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला माहित’; विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

जेव्हा नाचायला लागली शालू… सोशल मीडियावर पोरं झाली चालू, पाहा व्हिडीओ

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

‘या’ बॅंकांमध्ये तुमची खाती तर नाहीत ना?; ‘या’ चार बँकेचं होतयं खाजगीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या